breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला अखेर सुरुवात

२८६ साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाला १० वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह आणखी पाच आरोपींविरोधातील खटल्याला अखेर शुक्रवारपासून सुरुवात झाली. खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) २८६ साक्षीदारांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली.

पुरोहित, साध्वीसह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंविअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा फौजदारी कट रचणे, तो अमलात आणणे, त्याद्वारे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. शुक्रवारी खटल्याची पहिलीच सुनावणी झाली. त्या वेळी एनआयएतर्फे साक्षीदारांच्या नावांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली. त्यात डॉक्टर, पोलीस अधिकारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ आणि पंच साक्षीदारांचा समावेश आहे. आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी एनआयएने २०० कागदपत्रेही सादर केली आहेत. विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी साक्षीदारांच्या नावांची यादी आणि कागदपत्रे स्वीकारत सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button