Mahaenews

हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला मारहाण; ३ अटकेत

Share On

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या गणवेशधारी कर्मचाऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्यामुळं पोलीस अडचणीत आले आहेत. या प्रकरणी ३ संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वसामान्यांकडून या घटनेचा जोरदार निषेध केला जात आहे.
सैनिकाला झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ २० एप्रिलचा आहे. संबंधित सैनिकाच्या मोटरसायकलचा एका स्विफ्ट कारला निसटता धक्का लागला. त्यानंतर कारवाल्यानं मोटरसायकलचा पाठलाग केला आणि भर रस्त्यात मोटरसायकल अडवून या सैनिकाला बेदम मारहाण केली. थोड्या वेळाने एक सँट्रो कार तिथं आली आणि त्यात बसलेल्या लोकांनीही त्या सैनिकाला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तीन आरोपींनी सैनिकाचे ओळखपत्र, मोटरसायकलचा परवाना या गोष्टी सैनिकाकडून काढून घेतल्या. हवाई दलानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version