breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान सतत हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. आता नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात एकूण तीनजण जखमी झाले असून यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. भाजपा खासदार अर्जुन सिंग यांच्या घरापासून काही अंतरावरच हा हल्ला करण्यात आला आहे. एकूण १५ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्यात आला असून यावेळी हल्लेखोरांनी ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचीही तोडफोड केल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ २४ परगना जिल्ह्याच्या जगदल भागात बुधवारी रात्री १८ नंबर गल्लीत ही घटना घडली. यात तीनजण गंभीर जखमी झाले. हे ठिकाण बॅरकपूर मतदारसंघाचे भाजपा खासदार अर्जुन सिंग यांच्या घराजवळच आहे. अर्जुन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, जवळपास १५ ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले. तसेच पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचे भाजपा नेते मुकूल रॉय यांनी यासंबंधी आम्ही निवडणूक आयोगाला संपर्क करू, असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button