breaking-newsराष्ट्रिय

सेल्फी काढताना जगनमोहन रेड्डी यांच्यावर विमानतळावर चाकू हल्ला

आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी दुपारी विशाखापट्टणम विमानतळाजवळ चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून श्रीनिवास असे त्याचे नाव आहे.

एअरपोर्ट कँटीनमध्ये तो काम करतो. श्रीनिवासने धारदार शस्त्राने जगनमोहन यांच्या डाव्या हातावर वार केल्यानंतर रक्तस्त्राव सुरु झाला. हल्लेखोराने विमानतळावरील व्हीआयपी कक्षात प्रवेश केल्यानंतर जगनमोहन यांच्यासोबत सेल्फी काढायचा आहे असे सांगून त्यांच्याजवळ गेला.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Andhra Pradesh: YSRCP chief Jagan Mohan Reddy stabbed on his arm by unidentified assailant at Visakhapatnam Airport today. More details awaited.

आपण फोटो काढतोय असे दाखवून त्याने जगनमोहन यांच्यावर अचानक चाकू हल्ला केला. या प्रकाराने तिथे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला तिथून फरफटत बाहेर नेले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button