breaking-newsराष्ट्रिय
सीबीएसई बारावीचा आज निकाल

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज, शनिवारी २६ मे रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील. गेल्या काही दिवसांपासून या निकालाच्या अनेक तारखा सोशल मीडियावर फिरत होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल www.cbseresults.nic.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे, अशी माहिती सीबीएसई प्रशासनाने दिली आहे.
या परीक्षेला ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा देशातील ४ हजार १३८ परीक्षा केंद्रावर; तर परदेशातील ७१ केंद्रांवर पार पडली. ही परीक्षा ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान पार पडली.