breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बापू, इन्हें माफ़ करना, सौ चुहे खाकर भी बिल्ली उपवास करने जा रही है !

बापू, इन्हें माफ़ करना
कुछ आदतें जानवरों से आयी है
सौ चुहे खाकर भी
बिल्ली उपवास करने जा रही है !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान सासवड पुणे येथे झालेल्या आजच्या सभेत धनंजय मुंडे नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या आजच्या उपहास आंदोलनावर टीका करतांना म्हणाले की, विरोधी पक्षाचे खासदार संसदेचे कामकाज चालू देत नाही म्हणून देशाचे पंतप्रधान व भाजपचे खासदार आपआपल्या मतदारसंघात उपोषणाला बसले आहेत. मी पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छितो की भाजप विरोधी पक्षात असताना तीन महिने अधिवेशन चालले नव्हते तेव्हा गप्प का होता?

भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. भाजपला माहिती आहे की ते पुढच्या निवडणुकांनंतर विरोधी पक्षात असणार, त्यामुळे आतापासूनच आंदोलनांची सवय लावून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे. बहुमत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर आजची तारीख इतिहासात नोंदली जाईल असेही मुंडे म्हणाले.

आजच्या या उपहास आंदोलनाच्या अनुषंगाने दिल्लीतील पत्रकार रामराजे शिंदे यांनी लिहिलेल्या आणि अल्पावधीत प्रचंड व्हायरल झालेली सौ चुहें खाकर..! ही कविताही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हणून दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button