breaking-newsक्रिडा

सचिनपेक्षा विराटला बाद करणे आव्हानात्मक!

ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज जेफ थॉमसन यांचे मत

दोन्ही काळातील गोलंदाजांच्या दर्जात भिन्नता असली तरी सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहलीची फलंदाजी विविधतेने नटलेली असून त्याला बाद करणे अधिक आव्हानात्मक आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी शुक्रवारी व्यक्त केली. त्यांच्या या विधानाने सचिन आणि विराट यांच्यातील चर्चेला पुन्हा पेव फुटला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत कोहलीने सचिनला मागे टाकत सर्वात जलद (२०५ डाव) १०,००० धावांचा टप्पा गाठला होता. कोहलीच्या सध्याच्या फॉर्मविषयी थॉमसन म्हणाले, ‘‘विराट हा सचिनपेक्षा अधिक अष्टपैलू आणि गुणवत्तावान आहे, असे मला वाटते. सचिन हा एक महान फलंदाज होता, यात वाद नाही. मात्र कोहली अधिक कणखर असून त्याला बाद करणे गोलंदाजांसाठी कठीण जाते. कोहली हवे तेव्हा आपल्या मनासारखे खेळू शकतो.’’

‘‘फलंदाज म्हणून कोहलीने गेल्या काही वर्षांत केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. मात्र यापूर्वीच्या काळातील फलंदाजांची मानसिकता व सध्याच्या पिढीची मानसिकता यामध्ये फार बदल आहे. त्या वेळी फलंदाज खेळपट्टीवर ठाण मांडण्याकडे अधिक लक्ष द्यायचे, पण आता अधिकाधिक धावा करण्याकडे त्यांचा कल असतो,’’ असे थॉमसन यांनी सांगितले.

थॉमसन यांनी भारतीय गोलंदाजांविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या भारतीय गोलंदाजांमध्ये परदेशातील खेळपट्टय़ांवरही २० गडी बाद करण्याची क्षमता आहे. किंबहुना ऑस्ट्रेलियापेक्षा भारताकडे अधिक सक्षम आणि ताकदवान वेगवान गोलंदाज आहेत, असे मला वाटते. त्यातच स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतासाठी काम सोपे झाले आहे. त्यामुळे या वेळी भारतालाच कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.’’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button