शाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट

सुपरहिट चित्रपट “जब वी मेट’च्या यशस्वीतेनंतर दहा वर्षांनी शाहिद कपूर आणि इम्तियाज अली पुन्हा नवीन चित्रपट काढणार होते. याबाबत दोघांनी अधिकृतपणे घोषणाही केली होती. मात्र, आता शाहिदने माघार घेतल्याचे समजते.
शाहिद कपूरने इम्तियाज अलीचा चित्रपट सोडला असून त्याने भूमिका करण्यास नकार दिला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, इम्तियाजच्या या चित्रपटाबाबत शाहिद खूप उत्साहित होता. त्याने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लुक पोस्टही दिली होती.
मात्र, स्क्रिप्टबाबत शाहिद आश्वस्त नसल्याने त्याने या चित्रपटातून आपले नाव वापस घेतले आहे. आता शाहिदच्या जागी इम्तियाज अली याने राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव ही भूमिका साकारणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
शाहिद कपूर सध्या सहकुटुंब सुटीची आनंद घेत असून दुसऱ्यांदा वडिल होण्याच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत त्याने आणि त्याची पत्नी मीरा या दोघांनी गुड न्यूज शेअर करत लवकरच मीशाची छोटी बहिण येणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते.