breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

‘शक्ती’ भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर, आयआयटी मद्रासचे यश

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. ‘शक्ती’ असे या मायक्रोप्रोसेसरला नाव देण्यात आले आहे. लवकरच तुमचे मोबाइल फोन, टेहळणी कॅमेरे आणि स्मार्ट मीटर्स या स्वदेशी बनावटीच्या ‘शक्ती’ मायक्रोप्रोसेसरवर चालतील.

या मायक्रोप्रोसेसरचे डिझाइनपासून सर्व काही आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंदीगड येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल.

वेगवेगळया उपकरणांना वेगवेगळया हार्डवेअरची, नव्या फिचर्सची आवश्यकता लागते. आमच्या नव्या डिझाईनमुळे सगळया गोष्टी अधिक सोप्या होणार आहेत असे आयआयटीच्या राइज प्रयोगशाळेतील आघाडीचे संशोधक कामकोटी वीजीनाथन यांनी सांगितले.

जुलै महिन्यात आयआयटी मद्रासमधील बॅचने ३०० चीप डिझाइन केल्या होत्या. अमेरिकेतील ऑरेगनच्या इंटेल सुविधा केंद्रात या चीप जोडण्यात आल्या होत्या. आता देशात पूर्णपणे स्वदेशी बनावटीने हा मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला आहे. या प्रोसेसरची टेक्नोलॉजी पूर्णपणे वेगळी आहे असे वीजीनाथन यांनी सांगितले. भारतात बनलेला मायक्रोप्रोसेसर १८० एनएमचा आहे तर अमेरिकेत बनवलेला प्रोसेसर २० एनएमचा आहे.

१८० एनएमचा मायक्रोप्रोसेसर कालबाह्य झाला असला तरी आजही जगातील अनेक अॅप्लिकेशन्समध्ये आवश्यक आहे. पारंपारिक ऊर्जा उपलब्ध असलेल्या प्रत्येक अॅप्लिकेशनमध्ये ही चीप उपयोगात येऊ शकते. अमेरिकेत बनवलेल्या मायक्रोप्रोसेसरला कमी ऊर्जा लागते तसेच ते मोबाइलमध्ये वापरता येऊ शकतात असे वीजीनाथ म्हणाले. आयआय़टी मद्रासने बनवलेल्या शक्ती मायक्रोप्रोसेसरने भारतीय उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयय़आटी मद्रासची टीम १३ कंपन्यांच्या संपर्कात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button