breaking-newsक्रिडा
विराट झाला भावूक !

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमात बंगळुरूच्या संघाला साजेसा असा खेळ करता आला नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूच्या संघाला १४ पैकी केवळ ६ सामने जिंकता आले. त्यामुळे संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. बंगळुरूच्या स्पर्धेतून पडल्यानंतर विराटने आज चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओत विराट आपल्या चाहत्यांना भावनिक साद घालत आहे. आपला संघ चांगले प्रदर्शन करू न शकल्याने तो आपल्या चाहत्यांची माफी मागत असून पुढील वर्षी चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन तो देत त्याने ट्विट केले आहे.