breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वाळू उपशासाठी नदीपात्रीत तयार केलेले रस्ते उखडले

थेऊर- हवेली तालुक्‍यातील थेऊर येथील मंडल अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे होत असलेल्या वाळू उपसा संर्दभातील तक्रारीची दखल घेत सलग दोन दिवस नदीपात्रातच ठाण मांडून अवैध रस्ते उखडून टाकले. नदीपात्रातील रस्ते, सिंमेटच्या मोठ्या आकारचे पाईप, त्यावरील पूल, रस्ता सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी या कारवाईत भुईसपाट केले आहे. यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना या कारवाईत चांगलाच दणका बसला असून नव्याने थेऊर मंडलाधिकारीपदी पदभार स्विकारलेल्या चंद्रशेखर दगडे यांच्या कार्यपध्दतीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महसूल पथकाने रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता राजबाग लोणी काळभोर, थेऊर व कोलवडी या परिसरातील मुळा मुठा नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी बनविलेले रस्ते व छोट्या पुलांची धूळधाण केली. याठिकाणी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात चोरून वाळू उपसा झाल्याचे महसूल पथकाला दिसून आल्याने त्यांनी सलग दोन ते तीन दिवस नदीपात्रात ठाण मांडून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध प्रकारास आळा घातला आहे.
महसूल पथकामध्ये मंडलाधिकारी दगडे, थेऊरच्या पोलीस पाटील रेश्‍मा कांबळे, लोणी काळभोरचे तलाठी विष्णू चिकणे, थेऊर येथील तलाठी संतोष चोपदार, मांजरी बुद्रुकचे तलाठी गोकुळ भगत, कोतवाल अविनाश वाघमारे, संजय जवळकर, बंटी राजपुरे, जीवन म्हस्के, रामदास तारु, पप्पू शिवले सहभागी झाले होते. अवैधपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात सातत्याने होत होत्या, त्यामुळे हवेली प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या आदेशानुसार महसूल पथकाने ही कारवाई केली.
महसूल पथकाने खासगी जेसीबी यंत्राच्या मदतीने नदीकिनारी व नदीपात्रातील अवैधपणे केलेले मार्ग उखडून टाकले. नदीकडे जाणाऱ्या मार्गावरही अडथळे तयार केले आहेत. सिंमेटचे मोठे पाईप वापरुन बनवलेले पूल व पाईपही उध्दवस्त केले. सलग दोन ते तीन दिवसातील कारवाईमध्ये पथकाच्या हाती एकही वाहन व यंत्रसामग्री न लागल्याने दंडात्मक कारवाई व शास्तीच्या रक्कमेची कारवाई झाली नाही. महसूलच्या सुरु असलेल्या कारवाईमुळे मात्र वाळू उपसा करणाऱ्यांची धांदल उडाली आहे.

  • इंदापूर व दौंड तालुक्‍यातून सर्वात जास्त चोरट्या मार्गाने वाळू पुणे शहर व उपनगरांमध्ये येते. यासाठी एका तालुक्‍यातील तहसीलदारास दुसऱ्याही तालुक्‍यातील अतिरीक्त चार्ज देण्यात आल्याने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबली आहे. आम्हीही दौंड व इंदापूर भागात स्वतः महसूल पथकासमवेत पाहणी करीत आहोत. अवैध उत्खनन व वाहतूककामी कडक कारवाई करण्याचे अधिकार प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिलेले आहेत. हवेली तालुक्‍याच्या पुर्व भागातील काही गावांमध्ये रात्रीचा चोरून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी आल्याने दुसऱ्या तालुक्‍यातील महसूल पथक नेमण्याचे विचाराधीन आहे. थेऊर मंडलाधिकारी व हवेलीतील सर्व मंडलाधिकाऱ्यांना अवैधपणे सुरु असलेले गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखणेकामी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
    – रमेश काळे, अपर जिल्हाधिकारी, पुणे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button