राष्ट्रवादी युवकतर्फे पुणे-लोणावळा लोकलमध्ये पार्थ पवारांचा केला प्रचार

पिंपरी – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दापोडी ते लोणावळा लोकलमध्ये प्रवाशांशी संवाद साधून पार्थ पवार यांना निवडून देण्यासाठी प्रचार केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली लोकलमध्ये प्रचार यंत्रणा राबवण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी प्रवासाच्या समस्या समजून घेत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभेच्या व्हिजन बाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी मागील खासदारांच्या निष्क्रियतेमुळे पुणे लोणावळा लोकलचे अनेक प्रश्न सुटले नसल्याचे बोलत होते. पार्थ पवार व पवार कुटुंबीयांनी केलेल्या विकासाची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे पवार कुटुंबच आमच्या समस्या सोडवू शकतील आम्ही पार्थ पवार यांच्या सोबत आहे अशी चर्चा लोकलमधील अनेक प्रवासानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवली.
यावेळी प्रदेश संघटक विशाल काळभोर, युवक प्रवक्ते भागवत जवळकर, पिं चि शहर युवक उपाध्यक्ष निखिल दळवी,संघटक शादाब खान सरचिटणीस प्रतीक साळुंखे, सरचिटणीस तुषार सोनवणे, सरचिटणीस किरण काकडे, रमनदीप सिंग कोली, सचिव ऋषिकेश सोनवणे, अमोल खंडागळे, संदीप दरेकर, तानाजी काळे, कुणाल देशमुख यांच्यासह अनेक पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळेस सहभाग घेतला होता.