breaking-newsराष्ट्रिय
राजकारणातून निवृत्ती घेणार – कुमारस्वामी

बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे म्हंटले आहे. जर तसं झालं नाही तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ असंही त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली.
“मी स्पष्टपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं आहे. निवडणुकीदरम्यान २४ तासांत हे केलं जाईल असं आश्वासन मी दिलं होतं. हे खरं आहे. तुम्ही श्वास घेण्यासाठी वेळ तर दिला पाहिजे. मला काही मर्यादा आहेत”, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. मी शांत बसलेलो नाही. शांत बसायला मी येडियुरप्पा नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तयारी केली आहे. जनतेसमोर ही माहिती उघड करण्यात येईल”, अशी माहिती कुमारस्वामी यांनी दिली आहे.