यंदा पाऊस सरासरीएवढा- हवामान विभाग

नवी दिल्ली: केरळमध्ये मंगळवारी सकाळी दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे. त्यामुळे त्याचे 6 जून रोजी मुंबईत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाऊसमान सरासरीएवढेच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
उत्तर-पश्चिम भारतात 100 टक्के पाऊस होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं असल्यानं सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकात येत्या दोन दिवसांत दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेळेवर येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागचे डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी वर्तवली आहे.