breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोदींसारखा भ्याड आणि घाबरट पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही- प्रियंका गांधी

खनऊ: मी आजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यासारखा भ्याड आणि घाबरट पंतप्रधान पाहिला नाही, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. त्या गुरुवारी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी उभ्या आयुष्यात नरेंद्र मोदी यांच्यासारखा भ्याड आणि घाबरट पंतप्रधान पाहिलेला नाही. मोठमोठ्या प्रचारसभांमुळे किंवा टीव्हीवर झळकल्यामुळे राजकीय ताकद वाढत नाही. तर जनता सर्वोच्च असते, याची जाण असणे ही खरी राजकीय ताकद असते. जनतेचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद, त्यांच्या समस्या सोडवण्याची ताकद, टीका सहन करण्याची ताकद आणि विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेणे यामध्ये खरी राजकीय ताकद असते. मात्र, सध्याचे पंतप्रधान तुमचे म्हणणे ऐकून घेणे सोडा पण तुम्हाला उत्तर देणेही गरजेचे समजत नाहीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले.

‘तुम्ही तर माझ्या आईवरही टीका केलीत’; मोदींचा विरोधकांवर पलटवार
लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे उरल्यामुळे राजकीय प्रचाराला चांगलीच रंगत चढली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी घराण्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा दाखला देत काँग्रेसची कोंडी केली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या सभेत मोदींनी राजीव गांधी यांनी राजीव गांधी यांनी भारतीय नौदलातील INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाकयुद्ध शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button