breaking-newsमुंबई
मालाडमधील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग

मुंबई: मालाड स्टेशनजवळील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग लागली आहे. आज सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येतेय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मालाड स्टेशनच्या अगदी जवळ हे दुकान आहे. स्टेशन परिसर आणि त्यातही ऑफिसला पोहोचण्यासाठी लोकांची घाई असल्याने याठिकाणी गर्दी वाढत आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.