Views:
290
नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाची, तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका व्यक्तीला ब्राझीलमधील नव्या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी केंद्र सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
भारतात अंगोला आणि टान्झानियातून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाची लागण झाल्याचे जानेवारी महिन्यात आढळून आले, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. हे सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ब्राझीलमधून आलेल्या एका व्यक्तीला तेथील नव्या कोरोनाची लागण झाल्याचे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळले. हा प्रवासी आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली असून त्याचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर लसीचा काय परिणाम होतो याची तपासणी सुरू आहे, असे भार्गव म्हणाले.
Like this:
Like Loading...