breaking-newsपुणे
बीआरटी मार्गाचे कॅरिडाॅर उखडून मेट्रो सुसाट
पिंपरी- निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाचे कॅरिडॉर उखडून महामेट्रोचे काम सुसाट सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची बीआरटीवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहे.
निगडी-दापोडी नंतर तयार झालेल्या सांगवी ते किवळे व नाशिकफाटा ते वाकड या मार्गांवर बीआरटी सुरू झाली. मात्र, अनेकवेळा मुहूर्त काढून देखील या मार्गावर बीआरटी सुरू होऊ शकली नाही. सद्यस्थितीत या मार्गावर बीआरटी कॅरिडॉर व 36 बसस्टॉप तयार आहेत. त्यापैकी काही बसथांब्याची दुरावस्था झाली होती. त्या बसथांब्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी, तर सुरक्षाउपायांसाठी महापालिकेने नुकताच मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, मेट्रोच्या कामासाठी आता बीआरटी ठिकठिकाणी बीआरटी कँरिडॉर काढण्यात येत आहे. पिंपरी चौकात खराळवाडी येथे मेट्रोसाठी बीआरटी कॅरिडॉर उखडून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्या ठिकाणी मेट्रोने कॅरिडॉर उखडण्यात आले. तेथे काही दिवसांपूर्वी सिग्नल व कँरिडॉरचे काम पालिकेने केले होते. त्यामुळे महापालिका व मेट्रो कंपनी यांच्यात बीआरटी व मेट्रोच्या कामाबाबत ताळमेळ नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. तर, दुसरीकडे या मार्गावर बीआरटी कॅरिडॉर, निगडीतील बीआरटी टर्मिनल, बसथांबे उभारणे, त्यांची दुरस्ती, सिग्नल यंत्रणा आणि इतर कारणांसाठी महापालिका सातत्याने कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे या प्रकारे बीआरटीवर पालिका करत असलेला खर्च पाण्यात जात आहे.