प्लास्टिक पिशव्यांचा साठा केल्याने स्वीटमार्ट दुकानावर दंडात्मक कारवाई

पिंपरी (महाईन्युज) – चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणा-या दोन स्वीट मार्टवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिक वापर बंदी मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी, प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री व वापर बंदी मोहीम राबविण्यात येत आहे. वाल्हेकरवाडी येथील पोर्णिमा स्वीट्स आणि भवानी स्वीट्स या दुकानांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, सहायक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे, के. बी. पारोल, आरोग्य निरीक्षक के. बी. पारोल, संतोष दराडे, संतोष कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, साठा, विक्री व वापर बंदी अंतर्गत यापुढेही कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांनी दिला आहे.