breaking-newsराष्ट्रिय

प्रांतवादातून आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांकडून पाच तरुणांची निर्घृण हत्या

आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांनी शांतता भंग करण्याचे कृत्य केले असून पाच तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त आहे. तिनसुकीया जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.

ANI

@ANI

Assam: 5 persons killed by United Liberation Front of Assam (ULFA) terrorists in Bishnoimukh village near Dhola-Sadiya bridge in Tinsukia district around 7 pm today.

सुत्रांच्या माहितीनुसार, तिनसुकीया जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी अचानक काही संशयीत उल्फा अतिरेक्यांनी काही तरुणांना पकडून एका रांगेत उभे केले आणि त्यांच्यावर गोळ्यांची बरसात केली. यामध्ये या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. तिनसुकीया जिल्ह्यातील खेरबाडीत ही घटना घडली. हत्या करण्यात आलेले हे पाचही तरुण मुळचे पश्चिम बंगालचे असल्याचे कळते. त्यामुळे हा प्रकार प्रांतवादातून घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mamata Banerjee

@MamataOfficial

Terrible news coming out of Assam. We strongly condemn the brutal attack in Tinsukia and the killing of Shyamlal Biswas, Ananta Biswas, Abhinash Biswas, Subodh Das. Is this the outcome of recent NRC development ? 1/2

हे पाचही तरुण एका दुकानात बसले होते. त्याचवेळी उल्फाचे काही अतिरेकी तिथे आले आणि त्यांनी या तरुणांना ते ब्रह्मपुत्र नदीच्या किनारी घेऊन गेले. तिथे त्यांना रांगेत उभे करुन त्यांची एकामागून एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला.

दरम्यान, या प्रकरणावरुन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ही घटना प्रांतवादातून झाल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारने आसाममध्ये केलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियानामुळे (एनआरसी) ही घटना घडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button