breaking-newsराष्ट्रिय

जम्मू काश्मीर : लष्कर आणि पोलीस कॅम्पवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

श्रीनगर : काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री हल्ला केला. राष्ट्रीय रायफल्सच्या आधिपत्याखालील या तळावर साडेआठच्या सुमारास काही ग्रेनेड्स फेकण्यात आली. दोन बाजूंनी झालेल्या या हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ राष्ट्रीय रायफल्स आणि हाजीन पोलीस स्टेशनच्या दोन्ही बाजून चार ते सहा दहशतवादी आले आणि त्यांनी लष्कर आणि पोलिसांवर ग्रेनेड हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button