पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मंगळवारी अंदाजपत्रक; शहरवासियांमध्ये उत्सुकता

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक मंगळवारी (दि. 18) सादर करण्यात येणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्यातच सादर केले जाते. मात्र, यंदा निवडणुक असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्यास बराच विलंब झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरचे पहिलेच अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये काय असणार आहे, याबाबत शहरवासियांमध्ये उत्सुकता आहे.
 महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे मंगळवारी सकाळी अकरा वाजता आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत.
 पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली असून भाजपच्या राजवटीला सुरवात झाली आहे. भाजपचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. भाजपच्या पहिल्याच अंदाजपत्रकात काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button