breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

दाढी काढली, वेश बदलला तरीही दहशतवाद्यांनी केली हत्या

जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांना आपल्या आई-वडिलांना भेटायची खूप इच्छा होती. त्यांनी दहशतवाद्यांना चकमा देण्यासाठी आपली दाढीही काढली होती. दहशतवाद्यांपासून बचावासाठी त्यांनी आपल्या पेहरावातही बदल केला होता. परंतु, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. रविवारी जेव्हा मीर (वय ३०) आपल्या घरी जात होते, त्यावेळी संवेदनशील असलेल्या पुलवामातील वहीबाग परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

मीर यांचे दुर्दैव इथेच थांबले नव्हते. त्यांचा मृतदेह जेव्हा त्यांच्या गावी आणला. त्यावेळी जमावाकडून तिथेही दगडफेक करण्यात आली. मीर हे जम्मू-काश्मीर पोलीस दलात सीआयडी विभागात कार्यरत होते. अनेक दिवसांपासून ते आपल्या आई-वडिलांची भेट घेऊ शकले नव्हते. पेहराव बदलल्यास दहशतवादी आपल्याला ओळखू शकणार नाहीत, असे त्यांना वाटले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. मीर यांना गावी न जाण्याची धमकी दिली होती, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ला करु शकतात. त्यामुळे त्यांना न जाण्यास सांगितले होते. परंतु, त्यांना आपल्या आई-वडिलांना भेटायची इच्छा होती. त्यांचे आई-वडील पुलवामातील सोंटाबाग येथे राहतात.

घरी जाता त्यांनी आपली दाढी काढली होती. आपल्या खासगी वाहनाने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दहशतवादी मला ओळखू शकणार नाहीत. हे त्यांचे अखेरचे शब्द होते. हसत हसत ते निघाले होते, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्यावर्षी त्यांची कुलगाम येथे बदली झाली होती. त्यानंतर याचवर्षी मार्चमध्ये त्यांची सीआयडीमध्ये बदली करण्यात आली होती. मीर यांचे वडीलही पोलीस दलात अधिकारी होते. दक्षिण काश्मीरमधील गांदरबल येथे ते पाच वर्षे कार्यरत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button