दक्षिण चीन सागरातील हस्तक्षेपाने संतप्त फिलिपाईन्सचा चीनला इशारा

मनिला (फिलिपाईन्स) – दक्षिण चीन सागरात चीनचा हस्तक्षेप वाढतच आहे. या बद्दल अमेरिकेने चीनला अनेकदा इशारे दिले आहेत. जगातील अनेक राष्ट्रांनी दक्षिंण चीन सागरातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबात नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता फिलिपाईन्सचा समावेश झाला आहे.
दक्षिण चीन सागराबाबत फिलिपाईन्सने चीनला कडक इशारा दिला आहे. जर चीनने मर्यादा ओलांडल्या, तर फिलिपाईन्स युद्धास सज्ज असल्याचे फिलिपाईन्सने चीनला ठणकावले आहे. फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी ही गोष्ट स्पष्ट केल्याचे फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री ऍलन पीटर कायतानो यांनी म्हटले आहे. कायतानो एका कार्यक्रमात बोलत होते. जर दक्षिण चीन सागर क्षेत्रात नैसर्गिक संसाधनांची कोणी लूटमार सुरू केली, तर आम्ही युद्धास सज्ज आहोत असे दुतेर्ते यांनी सागितले आहे.
दक्षिण चीन सागरात एका कृत्रिम बेटाची निर्मिती करणाऱ्या चीनने जवळपास संपूर्ण क्षेत्रावर आपला दावा सांगितला आहे. फिलिपाईन्सप्रमाणे व्हिएतनाम, तैवान आदी देशांचाही चीनला विरोध आहे.