दक्षिण अफ्रिकेच्या अध्यक्षांशी सुषमांची चर्चा

दर्बन – भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामफोसा यांच्याशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा केली. सुषमा स्वराज सध्या पाच दिवसांच्या दक्षिण अफ्रिका भेटीवर आल्या आहेत. ब्रीक्स आणि आयबीएसए परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे येथे काल आगमन झाले. त्यावेळी उपविदेश मंत्री लुवेलीन लॅंडर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रिक्रेच्या अध्यक्षांशी विविध बाबींवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितली.
महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेत असताना ते कृष्णवर्णीय असल्याने त्यांना पीटसबर्ग येथे रेल्वेच्या डब्यातून अपमानस्पदरित्या उतरवण्यात आले होते. त्या घटनेला 125 वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमीत्ताने दक्षिण आफ्रिकेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या कार्यक्रमांनाहीं सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत.