तुकोबांच्या पालखीचे 24 जूनला प्रस्थान

पिंपरी – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी सोमवारी (दि. 24 जून) प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. 26 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असेल. 11 जुलैला श्री क्षेत्र पंढरपुरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा 16 जुलैला परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल. 28 जुलै रोजी सोहळ्याची 28 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे.
पालखी सोहळा पंढरीकडे जाताना 29 जून रोजी असणारी (ज्येष्ठ कृष्ण 11) एकादशी यंदा यवत होणार असल्याची, तर “प्रदूषण मुक्त हरीत वारी’, “झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश जनजागृती करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प मधुकर मोरे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. काशिनाथ मोरे, ह.भ.प. अजित मोरे, ह.भ.प. संजय मोरे, विश्वस्त ह.भ.प विशाल मोरे, ह.भ.प. माणिक मोरे, ह.भ.प. संतोष मोरे यांच्या उपस्थित देण्यात आली आहे.