जान्हवीच्या ड्रेसवरच्या स्टोरीवर भडकला अर्जुन कपूर

अर्जुन कपूर नेहमीच आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत थोडा जास्त सतर्क असतो. आपल्या बहिणींबाबत काहीही बोललेले तो खपवून घेत नाही. आपली नाराजी अगदी खुलेआम व्यक्त करत असतो. जान्हवी कपूरच्या “धडक’चे शुटिंग जवळपास संपत आले आहे. त्यातलाच एक फोटो शूट व्हायरल झाला होता. आणि त्यातील एका ड्रेसवरून जान्हवीला ट्रोल केले जायला लागले होते.
एका फिल्मी वेबसाईटने जान्हवी कपूरच्या ड्रेसबाबत टीका केलेली पाहून अर्जुन जाम भडकला. त्याने या वेबसाईटवर आपला राग ओकायला सुरुवात केली. कोणत्या विषया महत्व द्यावे हे या मिडीयावाल्यांना समजत नाही. असे तो म्हणाला.
तुमचे डोळे हेच सर्व काही बघत असतात. अशा प्रकारे आपल्या देशात एका तरुणीकडे बघितले जाते हीच लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दात अर्जुनने आपला राग व्यक्त केला आहे. त्याच्या रागाच्या बाबतीत या वेबसाईटने कोणती प्रतिक्रिया दिली हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र एवढा थयथयाट केल्यावर त्यावर कोनीही प्रतिक्रिया देणार नाही. अर्जुन कपूर सध्या “नमस्ते इंग्लंड’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर परिणिती चोप्रा असणार आहे.