जागरुक नसलेला समाज घटनात्मक हमी असलेला स्वातंत्र्य हरवून बसतो-चेलमेश्वर

चेन्नई : जागरुक नसलेला समाज त्यांचा घटनात्मक हमी असलेला स्वातंत्र्य हरवून बसतो. असे अनेक समाजांच्या बाबतीत प्रत्यक्ष घटलेली आहे. त्यामुळे सतत जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन न्या. जे. चेलमेश्वर यांनी येथे व्यक्त केले आहे.
न्या. जे. चेलमेश्वर म्हणाले की, सर्व हालचालींवर व प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मग ती प्रक्रिया कार्यकारी असो वा वा न्यायिक. न्यायपालिकाही देशाचाच एक भाग आहे. त्यामुळे तिथे जे घडते, तेही समजून घ्यायला हवे. ‘लोकशाहीत समाजाची भूमिका’या विषयावर ते बोलत होते. आंध्र चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. ते म्हणाले की, जर या संस्थांपैकी कोणतीही संस्था राज्यघटनेनुसार आपले कर्तव्य करत नसेल तर, आपले स्वातंत्र्य संकटात सापडेल. स्वातंत्र्य निर्भिडतेशी संबंधित आहे. भित्रेपणाने स्वातंत्र्याचा आनंद घेताच येणार नाही.
ते म्हणाले की, समाज स्वातंत्र्य हरवून बसतो कारण तो याबाबत सतर्क नसतो. समाज सतर्क राहिला तर, सरकारसह प्रत्येक यंत्रणेमध्ये काय घडत आहे? यावर लक्ष असते व आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहते. न्या. चेलमेश्वर हे त्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ होते आणि त्यांनी अन्य तिघा न्यायाधीशांसह १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेवर भाष्य केले होते.