breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

गुजरात मधील वीज प्रकल्पाला अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टात आव्हान

वॉशिंग्टन – अमेरिकन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या उर्जा प्रकल्पाला कर्ज देण्यात आले आहे. या प्रकल्पाला गुजरात मधील खेडूतांनी चक्क अमेरिकेतील सुप्रिम कोर्टात आव्हान दिले असून सुप्रिम कोर्टानेही या आव्हान याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. ही याचिका आम्ही सुनावणी साठी मंजुर करीत आहोत असे कोर्टाने आज सांगितले असून कोर्टाच्या ऑक्‍टोबर पासून सुरू होणाऱ्या सत्रात त्यावर रितसर सुनावणी घेतली जाणार आहे.

बुधा इस्माईल जाम यांनी अन्य गावकऱ्यांच्या मदतीने या प्रकल्पाला आव्हान दिले आहे. टाटा मुद्रा वीज प्रकल्पामुळे त्या परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी एका अमेरिकन वित्तीय कंपनीने 450 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे.

या प्रकल्पाला आयएफसी अंतर्गत संरक्षण देण्यात आल्याने त्याला कोर्टात आव्हान देता येत नाही असे नमूद करून गावकऱ्यांची ही याचिका अमेरिकेतील ट्रायल कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यांच्या या निर्णयाला तेथील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. आम्ही या प्रकल्पाला आयएफसी नियमावलीनुसार संरक्षण देता येते काय याचा अभ्यास करून निर्णय घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button