breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खासदार संजय काकडे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून घरचा अहेर!

पुणे: पुणे महानगरपालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ‘बावळट’ असे संबोधणाऱ्या खासदार संजय काकडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ‘पुणेकर बंधू भगिनींनो आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीय’ या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्यामुळे संजय काकडे यांनी ‘पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत’, असं विधान केलं होतं. काकडे यांच्या विधानावरून पुणे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. याचाच परिणाम आज शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर्समधून पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button