breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

MHT CET 2018 चा निकाल जाहीर

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीसीबी गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पीसीएम गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग पहिला आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थाना 3 जून रोजी त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहे. पीसीबी गटात जान्हवी मोकाशी 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम आली आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हीने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

http://dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर जन्म तारख किंवा अर्ज क्रमांक अशी मागितलेली माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल दिसेल. रात्री बारा वाजल्यानंतर वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button