कासारवाडीत इमारतीची सीमा भिंत कोसळली, सहा वर्षे मुलाचा दुदैवी मृत्यू

पिंपरी ( महा ई न्यूज ) – कासारवाडी येथील यशवंत प्राईड या इमारती शेजारी महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. तेथून जेसीबीने खोदाई करताना अचानक इमारतीची सीमा भिंत कोसळून तिघेजण त्या ढिगा-याखाली अडकले होते. त्यात एका सहा वर्षीय मुलाचा समावेश होता. शर्थीचे प्रयत्न करुन दोघांना भितींखालून काढण्यात आले. परंतू, त्या सहा वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लोकेश ठाकूर असं भितीखाली अडकलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच ठेकेदाराकडे काम करणा-या दोन मजुरांना वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरु असतानाही त्या इमारतीची सीमा भिंत अचानक कोसळल्याने तीन जण त्या भिंतीखाली अडकले होते. त्यापैकी दोघांना सुखरूपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तेथेच खेळणा-या एक सहा वर्षाचा मुलगाही त्या भिंतीखाली अडकला होता. त्याला या भिंती खालून मुलाला बाहेर काढण्याचे अग्निशामक विभाग तसेच परिसरातील नागरिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. परंतू, त्या मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे