breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदान महिन्याभरानंतर होणार असलं तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यापूर्वीपासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या चार दिवसात फूट पडली आहे. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश पाटीलही नाराज असल्याची माहिती आहे. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत राहण्याबाबत ते दोघेही आज निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. गोकुळ मधील विरोधकांना एकत्र आणण्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रयत्न होता. मात्र तालुका स्तरावरील राजकारण विरोधकांची मोट बांधताना आडवं येऊ लागलं आहे. या गळतीमुळे राजर्षी शाहू आघाडीत अवघ्या काही दिवसांतच अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button