breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेस-जेडीएसचे आमदार ‘नजरकैदेत’

कर्नाटक: कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याआधी काँग्रेस-जेडीएस हे दोन्ही पक्ष सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. कारण, राज्यपालांनी एच. डी. कुमारस्वामींना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले असून, बहुमत सिद्ध करत नाही तोपर्यंत दोन्ही पक्षांची आमदारांवर करडी नजर असणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलांमध्ये ‘नजरकैदेत’ ठेवले आहे. त्यांना घरी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. कुमारस्वामींनी बहुमत सिद्ध करू, असा दावा केला आहे. त्याआधी त्यांना कोणतीही ‘रिस्क’ घ्यायची नाही. काँग्रेसने  त्यांच्या ७८ आमदारांना घरी जाण्यास मनाई केली आहे. त्यांना हिल्टन हॉटेलमध्ये ठेवलं आहे. जेडीएसच्या आमदारांनाही याच हॉटेलमध्ये ठेवले आहे. काही आमदारांना घरी परत यायचे आहे. पण त्यांना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितले आहे. बहुमत चाचणीपर्यंत आमचे सर्व आमदार हॉटेलमध्येच थांबतील. आमदारांसमवेत आणखी एक बैठक घेणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वरा यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खरगे, डी. के. शिवकुमार, के. सी. वेणुगोपाल यांनी आमदारांसोबत चर्चा केली आहे. पक्षाच्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी आमदारांना केले. भाजप अजूनही आपले आमदार फोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सतर्क राहा, असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button