Mahaenews

करसंकलन लाचखोर लिपिक निलंबित

Share On

पिंपरी – पिंपरी वाघिरे येथील कर संकलन विभागाचे कनिष्ठ लिपिक अमोल चंद्रकांत वाघेरे यांनी कर पावती देण्यासाठी दोन हजारांची लाच घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एका तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटचे पत्नीच्या नावाने हस्तांतरण करून कर पावती देण्यासाठी लिपिक वाघेरे याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली. त्यानूसार 26 मार्च रोजी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना वाघेरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम मधील तरतूदीनुसार लिपिक अमोल वाघेरे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

Exit mobile version