breaking-newsराष्ट्रिय
कठुआ प्रकरणी 7 जणांविरोधात आरोप निश्चित

पठाणकोट – कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी सात जणांविरोधात पठाणकोटच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज आरोप निश्चित केले. या प्रकरणातील आठवा आरोपी हा अल्पवयीन आहे.
या खटल्याची सुनावणी जम्मू काश्मीरच्या बाहेर करावी, अशी विनंती करणारा अर्ज पीडीत बालिकेच्या कुटुंबियांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जम्मू आणि काश्मीरच्या बाहेर करण्याचे आदेश दिल्यावर सात आरोपींना 31 मे रोजी सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
ही सुनावणी कठुआमधून पठाणकोटच्या सत्र न्यायालयात हलवण्याबरोबर दररोज करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.