breaking-newsमनोरंजन

‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या करणार ऑनस्क्रीन रोमान्स

‘बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरेच विक्रम रचले. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका तर लोकांनी इतकी डोक्यावर उचलून घेतली की त्यांना आता कटप्पा म्हणूनच ओळखू लागले. सत्यराज हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सत्यराज यांच्यासोबत काम करणार आहे. ऐश्वर्या कटप्पासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

मणिरत्नम यांच्या ‘पोन्निनी सेल्वम’ या आगामी चित्रपटात सत्यराज महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत आहे. तर ऐश्वर्याच्या पतीची भूमिका सत्यराज साकारणार असल्याचं कळतंय. यामध्ये ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. एका तामिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटातील एका भूमिकेसाठी मणिरत्नम यांनी अमिताभ बच्चन यांनासुद्धा विचारलं आहे. पण अद्याप त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. या चित्रपटात ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेसाठी आधी मोहनबाबू यांना विचारण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव आता ते या चित्रपटात काम करणार नसून सत्यराज यांची वर्णी लागली आहे.

ऐश्वर्या याआधी ‘फन्ने खाँ’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अयशस्वी ठरला. आता दाक्षिणात्य चित्रपटात ऐश्वर्याची जादू चालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button