breaking-newsआंतरराष्टीय
एससीओ बैठकीसाठी चीनचे इराणला निमंत्रण – रुहानी उपस्थित राहणार

बीजिंग (चीन) – पुढील महिन्यात होणाऱ्या एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या बैठकीसाठी चीनने इराणला निमंत्रण दिले आहे. चीनचे निमंत्रण स्वीकारून इराणचे अध्यक्ष हसन रूहानी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या या बैठकीत सहभागी होणार आहेत. चीनचे राष्ट्रीय सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली आहे.
10 जून 2018 रोजी एससीओची बैठक पूर्व चीनच्या शॅंगडॉंग प्रांतातील किंगदाओ या शहरात भरवण्यात येणार आहे, भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांना गेल्या वर्षी एससीओचे सदस्य बनवण्यात आलेले आहे.
इराण आण्विक करारातून अमेरिका बाहेर पडल्याने चीनने जाणीवपूर्वक इराणला एससीओमध्ये सामील करून घेतले असावे असे बोलले जात आहे.