breaking-newsराष्ट्रिय

आयसीयूमध्ये उंदराने कुरतडल्यामुळे ९ दिवसांच्या बालकाचा मृत्यू

बिहारमधील दरभंगा येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. येथील डीएमसीएच रुग्णालयात उंदरांनी कुरतडल्यामुळे एक नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. पीडित कुटुंबीयाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Darbhanga: 9-day-old infant died allegedly after being bitten by rats in NICU of Darbhanga Medical College & Hospital on October 29. Dr. Om Prakash says “I’ve no such information. Family is claiming so. But we can investigate it since we know there is menace of rats here”.

नऊ दिवसाच्या एक नवजाताला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री जेव्हा कुटुंबीय बालकाला पाहण्यासाठी एनआयसीयूत आले. तेव्हा उंदर बालकाचे हात-पाय कुरतडत असल्याचे दिसले. त्यावेळी तिथे नर्स आणि डॉक्टरही नव्हते. नर्सला तिथे बोलावण्यात आले. तोपर्यंत त्या बालकाचा मृत्यू झाला होता.

डीएमसीएचच्या अधीक्षकांनी हा आरोप फेटाळला आहे. उंदरांनी कुरतडल्यामुळेच ते बालक जखमी झाले होते. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरीही कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी बिहारमधील सदर रुग्णालयात असाच बेजबाबदार पाहण्यास मिळाला होता. रेल्वे अपघातील जखमी युवकाला तिथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसमोरच जखमी युवकाचा तुटलेल्या पायाचा तुकडा कुत्र्याने नेला होता. नंतर कुत्र्याचा शोध घेण्यात आला. पण तो मिळाला नाही. जखमी युवकाने नंतर उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button