breaking-newsमुंबईराष्ट्रिय

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली

ठाणे : बॉलिवूड सुपस्टार सलमान खाननंतर त्याचा धाकटा भाऊही कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हं आहेत. अभिनेता अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. खान कुटुंबाला अरबाजच्या सवयीचा प्रचंड तिटकारा असल्याचीही माहिती आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला. आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.

अरबाजवर दबाव आणून त्याचे पैसे सोनूने गुंतवल्यामुळे अरबाज थेट आरोपी होत नाही, त्यामुळे अरबाजला साक्षीदार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अरबाजला समन्स बजावलं होतं. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत अरबाजने ही कबुली दिली. चौकशीला जाण्यापूर्वी अरबाज खानने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन सलमानची भेट घेतली होती. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात अरबाजसोबत सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि वकील होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button