आंतरराष्टीय

आता फेसबुक करणार सर्वात जलद भाषांतर!

नवी दिल्ली: कोणत्याही भाषेतील ज्ञान प्राप्त करता यावे म्हणून सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता भाषांतराचा जलद पर्याय देण्यास सज्ज झालं आहे. त्यासाठी सध्या कंपनीने एक प्रोटोटाइप तयार केले असून इतर भाषांतर सॉफ्टवेअर्सच्या तुलनेत आपले सॉफ्टवेअर नऊ पट वेगाने भाषांतर करण्यासाठी सक्षम असल्याचा दावाही फेसबुकने केला आहे.
सामान्यतः पुस्तकातील माहितीचे भाषांतर आणि सामान्य बोलीचे भाषांतर यात फरक असतो. मात्र सर्वसामान्यांना त्यांच्या सहज-सोप्या भाषेतच कोणतेही भाषांतर उपलब्ध व्हावे यासाठी एक उत्कृष्ट भाषांतर सॉफ्टवेअर तयार करत असल्याचे फेसबुकमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सवर काम करणारे इंजिनीअर डेव्हिड ग्रेंगिअर यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून भाषांतराची जलद सुविधा देणारे हे नवे तंत्रज्ञान सध्या संशोधनाच्या टप्प्यावर असून लवकरच ते सर्वांना वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.
आपला मेंदू जसे भाषेचे सहज आकलन करतो त्याप्रमाणेच हे सॉफ्टवेअर कोणत्याही वाक्याचा अनुवाद करण्यापूर्वी ते तसेच समजून घेईल, अशा पद्धतीने ते तयार केले जात असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे. मात्र फेसबुक कोणकोणत्या भाषांमध्ये अनुवादाची सुविधा देणार आहे, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. गुगल आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्याची सुविधा सध्या उपलब्ध असल्याचे आपल्याला माहितच आहे. मात्र यांत्रिक पद्धतीने केलेल्या त्या अनुवादांचा फारसा उपयोग होत नसल्याने अशात नव्या तंत्रज्ञानासह येणारी फेसबुकची ही भाषांतराची सुविधा किती उपयुक्त ठरते ते पाहावे लागेल…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button