breaking-newsआंतरराष्टीय

…तर मास्क घालण्याची गरज नाही; अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन्स

वॉशिंग्टन– एकीकडे जगभरातील देश कोरोना संकटावर मात करण्यासाठी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोर करत असतानाच दुसरीकडे अमेरिकेतील लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात आली असून लसीकरण पूर्ण झाले असेल त्यांनी आता मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. तसेच ज्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही त्यांनी अंतिम आपली सुरक्षा करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, ‘काही तासांपूर्वीच सीडीसीने पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे. ही शिफारस खरी असून घरात किंवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे. मला वाटते हा मोलाचा टप्पा आहे. हा एक मोठा दिवस असून नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. गेल्या १४४ दिवसांपासून आपण लसीकरण करत असून जगाचे नेतृत्त्व केले आहे. संशोधक, शास्त्रज्ञ, औषध कंपन्या, लष्कर, फेमा, डॉक्टर्स, परिचारिका, द नॅशनल गार्ड, गव्हर्नर अशा अनेकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. जास्तीत जास्त अमेरिकन नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी आकाश आणि जमीन एक करणाऱ्या प्रत्येकामुळे हे शक्य झाले’, असे त्यांनी म्हटले.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘एक दिवस येईल जेव्हा गमावलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण आपल्या डोळ्यांत अश्रू आणण्याआधी चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल.’ त्याचबरोबर बायडन यांनी यावेळी अद्यापही लसीकरण न झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button