अफगाण सुरक्षा दलाकडून चुकीने झाली 9 जणांची हत्या

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाण सुरक्षा दलाकडून चुकीने 9 जणांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अफगाणिस्तानच्या नंगरहार भागात रात्रीच्या वेळी घातलेल्या एका छाप्यात ही गोष्ट जाहीर झाली आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये बहुसंख्य नागरिकांचा समावेश असल्याचे समजते.
चापहारा जिल्ह्यातील नंगरहार येथे सोमवारी रात्री एका घरावर मारलेल्या छाप्यादरम्यान 9 जण मारले गेले आणि 8 जण जखमी झाल्याचे प्रांतीय गव्हर्नर हयातुल्लाह हयात यांनी सांगितले आहे. मृतांमध्ये एका पोलीस कमांडरचा समवेश आहे. छापा मारलेल्या घरातून गोळीबार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
छापा कारवाई पूर्ण झाल्यानंतर घराची झडती घेताना मृतदेह हाती लागले. नंगरहार हॉस्पिटलचे प्रवक्ता इनामुल्लाह यांनी छाप्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये 9 मृतदेह आल्याची पुष्टी केली आहे.
पूर्व अफगाणिस्तानात तालिबानी आणि आयएसआय दोन्ही दह्शतवादी गट सक्रिय आहेत.