breaking-newsआंतरराष्टीय
अफगाणिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार

काबुल – अफगाणिस्तानाच्या पश्चिम फराह प्रांतात लष्कराचे एके हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार झाले आहेत. अनारदारा जिल्ह्यात ही दुर्घटना झाल्याचे प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते नासिर मेहंदी यांनी सांगितले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांना घेऊन हेरात प्रांताकडे जांणारे हे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी दुर्घटनाग्रस्त झाले.
हेलिकॉप्टरमध्ये अफगाणिस्तानच्या पश्चिमी कोअरचे उप कमांडर आणि फराह प्रांतीय परिषदेच्या प्रमुखांचीही समावेश आहे. दोन हेलिकॉप्टर्स एकामागोमाग एक जात असताना एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेतून कोणीही वाचलेले नाही. असे जफर सैन्य तुकडीचे प्रवक्ते नजीबुल्लाह नाजीबी यांनी सांगितले आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्यदल घटना स्थळी पाठवण्यात आले आहे.