breaking-newsआंतरराष्टीय
अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील स्फोटात सहा ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात तालिबानी गनिमांनी घडवून आणलेल्या स्फोटात एकूण सहा जण ठार झाले असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रांतातील गनिम साधारणपणे सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करीत असतात पण त्यांनी रस्त्याच्या कडले घडवून आणलेल्या या स्फोटात सामान्य नागरीकच बळी पडले आहेत. गझनीत अन्यत्र झालेल्या चकमकीत तीन पोलिस कर्मचारी आणि दहा तालिबानी गनिम गेल्या 24 तासांत ठार झाले आहेत.
सध्या तेथे सरकारने रमझान महिन्याच्या निमीत्त आठवडा भराची शस्त्रसंधी जाहींर केली आहे. तालिबान्यांनीही ईदच्या आधी तीन दिवस शस्त्रसंधी करण्याची घोषणा केली आहे. त्यातून सद्भावनेचे वातावरण निर्माण होण्याऐवजी घातपाती कारवाया सुरूच आहेत.