breaking-newsमनोरंजन

‘सिम्बा’ची परदेशातही गाडी सुसाट , १०० कोटींपासून काही पावलं दूर

रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला ‘सिम्बा’ गेल्यावर्षी डिसेंबर अखेरीस प्रदर्शित झाला. या चित्रपटानं भारतात २०० कोटींहून अधिकची कमाई केली. तर जगभरातही हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. विशेष म्हणजे ४ आठवड्यात ‘सिम्बा’चं इंटरनॅशनल कलेक्शन हे ९२ कोटींवर पोहोचलं आहे.

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथलं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ९२ कोटी ८० लाख आहे. २० जानेवारीपर्यंतचं हे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे. परदेशातील जवळपास ९६३ स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटानं भारतात २३६.८० कोटींची कमाई केली आहे. रणवीरसोबतच सारा अली खान आणि ११ मराठी कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. रोहित शेट्टीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

taran adarsh

@taran_adarsh

crosses $ 13 mn from international markets, after Weekend 4… Inches closer to ₹ 💯 cr mark … Total till 20 Jan 2019: $ 13.034 million [₹ 92.80 cr]… USA+Canada has performed best, nears $ 5 mn mark.

219 people are talking about this

ऑस्ट्रेलियामध्ये ‘सिम्बा’ला खूप मोठी ओपनिंग पहिल्याच आठवड्यात मिळाली होती. यापूर्वी रोहित शेट्टीचे ‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिर्टन’ चित्रपट परदेशात प्रदर्शित झाले होते त्यांना चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र सिम्बाला या सर्व चित्रपटांहून अधिक प्रतिसाद मिळला. ‘सिम्बा’ २८ डिसेंबरला जगभरात ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला. २०१८ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button