breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराष्ट्रिय

महाराष्ट्राला पुन्हा हुडहुडी, थंडीचा जोर वाढणार; वाचा हवामान अंदाज..

राज्याला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. आता राज्यात परभणीचे तापमान 8.2 अंश सेल्सिअसवर, औरंगाबादचे तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर नागपूरचे तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर आले आहे. यासोबतच पुण्याचे तापमान 10.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. आता पुढील काही दिवसात हा पारा आणखी खाली जाऊन थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडी गायब झाल्यानंतर दाट धुके पसरले होते. त्यापूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचं दिसलं. मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठताना दिसतो आहे.

आता सध्या उत्तर भारत व राजस्थानमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान घसरले आहेत. त्यात परभणी 8.2, नागपूर 9.4, औरंगाबाद 9.6, यवतमाळ 10.0, पुणे 10.3, अमरावती 10.5, अकोला 10.6, गोंदिया 10.8, वर्धा 11.2, नाशिकचे तापमान 11.3, चंद्रपूरचे तापमान 11.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

भारतात अनेक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यात उत्तराखंड, तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद अशा भागात येत्या 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची देखील जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button