breaking-newsमहाराष्ट्र

संस्थाध्यक्षाच्या पुत्राकडून मारहाण; कर्मचाऱ्याची जीभ कापली गेली

  • थकीत वेतन मागण्यासाठी घरी गेलेल्या कर्मचाऱ्याला डॉ. अजय वासाडेकडून मारहाण

चंद्रपूर – आठ महिन्यांचे थकीत वेतन व तीन लाखाचा धनादेश बँकेत न वटल्याप्रकरणी बल्लारपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा वासाडे यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलेल्या शिक्षकेतर कर्मचारी विवेक सातपुते याला संस्थाध्यक्षांचे पुत्र डॉ. अजय वासाडे यांनी मारहाण केली. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मारहाणीत कर्मचाऱ्याची जीभ थोडी कापली गेली आहे. दरम्यान, संस्थाध्यक्षांच्या घरी एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाणीची ही दुसरी घटना आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार महर्षी अ‍ॅड. बाबा वासाडे अध्यक्ष असलेल्या बामणी येथील बल्लारपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात वर्षभरापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे महाविद्यालयात काही दिवसांपासून संप सुरू होता. थकीत वेतन देता येत नसल्यामुळे संस्थाध्यक्षांनी यावर्षी महाविद्यालयाला सुट्टय़ाही अधिक दिल्या. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर काही कर्मचारी वेतन मिळेल, या आशेने कर्तव्यावर रूजू झाले. यातील एक कर्मचारी लॅब असिस्टंट विवेक सातपुते हा सुद्धा रूजू झाला. विशेष म्हणजे, सातपुते याचे मागील आठ महिन्यांपासून वेतन नाही. त्यातच त्याला वेतन स्वरूपात दिलेला तीन लाखाचा धनादेश हा बँकेतून परत आला. त्यामुळे आज सातपुते थकीत वेतन व तीन लाख रुपये घेण्यासाठी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. वासाडे यांच्या घरी गेले. यावेळी संस्थाध्यक्षांचे चिरंजीव डॉ. अजय वासाडे व सातपुते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान भांडणात व नंतर मारहाणीत झाले.

यावेळी दोघांमध्ये इतकी मारामारी झाली की अ‍ॅड. वासाडे यांच्या मारहाणीत सातपुते यांची जीभ कापली गेली. त्यामुळे सातपुते यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठले आहे. याप्रकरणी डॉ. वासाडे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी बीआयटीचे काही कर्मचारीही रामनगर ठाण्यात बसून आहे. तक्रार प्राप्त होताच रामनगर पोलीस सातपुते यांना वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. मात्र बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात विचारले असता, तक्रार देण्यासाठी सातपुते व इतर कर्मचारी आले असल्याची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button