breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिराळा विधानसभा मतदार संघात वृक्ष लागवड अभियान यशस्वी होईल; आमदार शिवाजीराव नाईक यांचा विश्वास

शिराळा (प्रतिनिधी) – केंद्र सरकारचे वृक्ष लागवड अभियान पर्यावरण संवर्धनासाठी अतिशय उपयुक्त असून ही  चळवळ शिराळा विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात यश येईल, असा विश्वास आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला.

 

निगडी व तडवळे ता. शिराळा येथून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाची सुरवात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील प्रमुख उपस्थित होते.

 

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, काळाची गरज ओळखून केंद्र व राज्य सरकारने वृक्ष लागवडीचे अभियान हाती घेतले आहे. हे पर्यावरणाच्या समतोलासाठी अतिशय उपयुक्त असून ते वनविभागाच्या सहकार्यातून प्रभावीपणे राबिवण्यात यश येईल. नागरीकांनी या वृक्ष लागवड चळवळीत सामाजीक कर्तव्याच्या जाणीवेतून स्वयंस्त्फुर्तपणे सहभागी व्हावे. झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन व निकोप वाढ करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वनराई वाढली तरच पर्यावरणाचा समतोल राहील. जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिकचा वापर टाळावा. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. भाजप सरकारने अशा अनेक सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी खोलवर रुजवण्यात यश मिळवले आहे.

 

यावेळी वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमास रघुनाथ पाटील, सर्जेराव यादव, सुनील पाटील, वृक्ष लागवड अधिकारी कोळी, सरपंच मेघा पाटील, मोहन पाटील, माजी सरपंच कुंभार, माजी उपसरपंच वसंत सुतार, जालिंदर पाटील यांचेसह निगडी व तडवळे परिसरातील नागरिक व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button