breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहरात विविध भागात पावसाच्या सरी

 पुणे:-  पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने भर उन्हाळ्यात शहरातील वातावरण काही प्रमाणात थंड झाले. पिरंगुटमध्ये गारांचा पाऊस पडला. पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील भोसरी, चाकण कासारवाडी भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच मावळ भागात तळेगाव, वडगाव परिसरात पाऊस पडला.

आज पुणे शहर परिसरात कमाल तापमान 36.8 तर किमान 22.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. सकाळपासून उन्हाने कहर केला होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीर थंड करण्यासाठी आईस्क्रीम, उसाचा रस, लिंबू सरबत मिळणा-या ठिकाणी नागरिक एकच गर्दी करीत होते. मात्र पाऊस पडल्यानंतर ही गर्दी काहीशी कमी झाली. तुरळक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील वातावरण काही प्रमाणात थंड झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button